लार्सन अँड टुब्रो कंपनीला मिळाले एवढे मोठे कॉन्ट्रॅक्ट । गुंतवणूकदार होणार मालामाल | L & T Share Price | Larsen and Tubro
नमस्कार, स्वागत आहे तुमचं फायनान्स न्यूज मध्ये.
लार्सन अँड टुब्रो ही भारतातील अग्रगण्य बांधकाम क्षेत्रातील कंपनी आहे. गेल्या काही दिवसापासून या कंपनीचा शेअर प्राईस खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आणि या कंपनीने गुंतवणूकदारांना खूप चांगला फायदा मिळवून दिलेला आहे.
आता या कंपनीला एम एम आर डी ए म्हणजेच मुंबई महानगर विकास प्राधिकरण यांच्याकडून 7000 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरमध्ये मुंबई ऑरेंज गेट आणि ईस्टर्न हायवे दरम्यान कोस्टल रोड ब्रिजच्या बांधकामात भूमिगत बोगदा बनवण्याचं काम या कंपनीला मिळाला आहे. या आठवड्यामध्ये लार्सन अँड टू ब्रो या कंपनीचा शेअर प्राईस तीन हजार 26 रुपया वरती क्लोज झालेला आहे. 2600 रुपयांपासून सुरू झालेली या शेअरची रॅली तीन हजार रुपये इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आणि कंपनीला भविष्यामध्ये अजून मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची मोठी शक्यता आहे त्यामुळे ही कंपनी भविष्यामध्ये गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर फायदा मिळवून देऊ शकते..
कंपनीला एमएमआरडीएच हे काँट्रॅक्ट पूर्ण करण्यासाठी 55 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे.
या मोठ्या ऑर्डर वरती कंपनीने सेबीला जे स्पष्टीकरण दिले आहे त्यात असं कळवलेल आहे की या नवीन ऑर्डर अंतर्गत पॅनल बोरिंग मशीन चा वापर करून दुहेरी रस्त्याच्या बोगद्याचे डिझाईन आणि बांधकाम करण्याचे काम मिळालेला आहे हे बोगदे मुंबईतील साउथ टर्मिनल जवळ ऑरेंज गेट इथे रॅम द्वारे बांधली जाणार आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीलाच Larsen and Tubro या कंपनीला सौदी ची सर्वात मोठी कंपनी सौदी अरमको या कंपनीकडून देखील गॅस प्रकल्पाचे काम करण्यासाठी 2.9 अब्ज डॉलर्स एवढी मोठी ऑर्डर मिळालेली आहे.
तर मग मित्रांनो या कंपनी विषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका. व एक गोष्ट लक्षात असू द्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. धन्यवाद.

Comments
Post a Comment