सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचे मोठे दिवाळी गिफ्ट
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बुधवारी महागाई भत्ता वाढवण्यासाठीचा निर्णय कॅबिनेट बैठकीमध्ये घेतलेला आहे. याआधी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जून महिन्यामध्ये 42 टक्के महागाई भत्ता करण्यात आला होता परंतु दिवाळीच्या तोंडावरती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गिफ्ट म्हणून शासनाने यामध्ये दोन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आता हा महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 44 टक्के करण्यात आलेला आहे. या निर्णयाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेला आहे. पगारामधील हा फरक जून महिन्यापासून देण्यात येणार आहे. म्हणजेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता भरघोस पैसे दिवाळीच्या तोंडावरती मिळणार आहेत. धन्यवाद
%20-%20Made%20with%20PosterMyWall.jpg)
Comments
Post a Comment