Home Loan वर मिळणार आता सबसिडी | गृहकर्जावर मिळत आहे Subsidy | Home Loan Subsidy | Breaking News

home loan subsidy


नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आहे का नवीन अशा बातमीमध्ये.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्या मधून आलेली एक कल्पना म्हणजेच Home Loan Subsidy. लवकरच ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे. 


मित्रांनो प्रत्येकाचे स्वतःचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु वाढत्या महागाईमुळे आणि घरांच्या आवाज तो किमतीमुळे सर्वसामान्यांना घर घेताना नाकी नऊ येतात. परंतु आता केंद्र सरकारने या सर्व बाबींचा विचार करून पुढील पाच वर्षांसाठी स्मॉल अर्बन Housing Loan आता सबसिडी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जवळपास केंद्र सरकार 60000 कोटी रुपयांची योजना तयार करत आहे. 

ही योजना लवकरच सुरू होण्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. पुढील वर्षी केंद्राच्या निवडणुका आहेत आणि यावर्षीच्या अखेरीस काही राज्यांच्या निवडणुका आहेत या सर्वांचा विचार करून केंद्राने यावर्षीच्या अखेरीपर्यंत ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या भाषणात या योजनेचे वक्तव्य केलं होतं परंतु तेव्हा ही योजना एवढ्या लवकर कार्यान्वित होईल अशी कुठलीही शक्यता नव्हती. परंतु आता ही योजना लागू होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून नऊ लाख रुपये पर्यंतच्या कर्जाच्या रकमेवरती साडेसहा टक्क्यापर्यंत वार्षिक अनुदान प्राप्त होणार आहे. हे अनुदान व्याजावरती असणार आहे हे लक्षात ठेवा. या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी तुमचं गृह कर्ज हे 50 लाख रुपयांपेक्षा कमी असाव. आणि परतफेडीचा कालावधी हा कमीत कमी वीस वर्षांचा असावा तरच या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल. खास करून शासनाने ही योजना सर्वसामान्य गरजू लोकांसाठी आणलेली आहे. 
आम्हाला मिळालेले माहितीनुसार, सबसिडी ही थेट लाभार्थ्याच्या हाऊसिंग लोन खात्यामध्ये जमा करण्यात येईल. याकरता मंत्रिमंडळाची मंजुरी महत्त्वाची आहे आणि सध्या ती घेण्याचं काम चालू आहे. शासनाच्या माहितीनुसार जवळजवळ दहा ते पंधरा कोटी अर्जदारांना या योजनेचा लाभ होऊ शकतो.

तर मग मित्रांनो तुम्ही जर गृह कर्ज घेणार असाल तर थोडं थांबा ही योजना लवकरच लागू होणार आहे आणि या योजनेचा लाभ आपण घ्यावा अशी आपणास विनंती. धन्यवाद..


 

Comments