Pune madhe honar navin paryatan kendra
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन अशा बातमीमध्ये. मित्रांनो महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेला पुणे जिल्हा पर्यटनासाठी ही प्रसिद्ध आहेच. पुण्यातील शनिवार वाडा सिंहगड किल्ला हे कित्येक लोकांची आवडीची ठिकाण आहेत. पुण्याच्या आसपास सुद्धा बरीच पर्यटन केंद्र आहेत जी लोकांना खुणावत असतात. तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळ तालुक्यातील कुसवली पठार हे पर्यटनाचे केंद्र बनवण्यासाठी बैठक घेतली आहे.
मावळ पासून मुंबई हे कमी अंतरावर आहे त्यामुळे या ठिकाणी पर्यटनाचा विकास हा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो असे अजित पवारांचे मत आहे. त्यामुळे याचा विकास आराखडा लवकरात लवकर तयार करावा अशा सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत. कुसुल हे जागतिक पर्यटन केंद्र बनवण्यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वासन या वेळी त्यांनी दिले. या बैठकीसाठी पर्यटन विभाग सचिव राधिका रस्तीगी उपस्थित होत्या. कुसवली पाठरचा परिसर 1200 एकरचा असून त्या ठिकाणी 3 धरणे आहेत. त्यामुळे आता पुण्याचा विकास जागतिक पर्यटन केंद्र म्हणून सुद्धा होणार आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
%20-%20Made%20with%20PosterMyWall.jpg)


Comments
Post a Comment