जवान ने तोडला कमाईचा रेकॉड ! कमावले ७०० कोटी, तर भारतात केली एवढी कमाई | Jawan film earning record

 

jawan

सर्वांचा लाडका Shahrukh Khan याचा बहुचर्चित चित्रपट Jawan सध्या जगभरामध्ये धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने नवनवीन रेकॉर्डस निर्माण केलेले आहेत कमाईच्या बाबतीत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तब्बल 80 कोटींची कमाई केली होती. चित्रपट प्रदर्शित होऊन 18 दिवस झालेले असतानाच अद्याप या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली दिसत नाही. या चित्रपटाचे आत्ताचे आकडे समोर आलेले आहेत. त्यानुसार या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून 700 कोटींची कमाई केलेली आहे. हे पाहता लवकरच हा चित्रपट एक हजार कोटींची ही कमाई करेल असा चित्रपट निर्मात्यांचा विश्वास आहे. हिंदी बरोबरच तमिळ तेलुगु मध्येही या चित्रपटाने जबरदस्त कमाई केलेली आहे. शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला एवढेच पैसे जमा करण्यासाठी तब्बल दीड महिना लागला होता. त्या तुलनेने या चित्रपटाची कमाई जास्त आहे. पठाने गदर २ ला मागे टाकले आहे. 

Jawan


या चित्रपटामध्ये शाहरुख खानची मुख्य भूमिका असून त्याचे तब्बल पाच लोक चहा त्यांना पाहायला मिळत आहेत. त्यासोबतच चित्रपटामध्ये नयनतारा विजय सेतु पती प्रियमनी गिरीजा ओक सिद्धी डोंगरा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. 
तर मग मित्रांनो जवांच्या या कमाई बद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही इतरांसोबत शेअर करायला विसरू नका. 

Comments