जेष्ठ नागरिकांना मिळणार आता पेन्शन | केंद्र सरकारचा मोठा निर्णय | Atal pension yojana

 

Senior citizen pension

Atal pension yojana

Senior citizen pension

नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच.. अटल पेन्शन योजनेअंतर्गत आता सर्वसामान्यांना पेन्शनची सोय भारत सरकारने केली आहे. दर महिन्याला तुम्ही पाच हजार रुपयापर्यंत पेन्शन मिळवू शकता. ती कशी व कोण मिळू शकत याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत. जे लोक मजूर शेतकरी शेतमजूर किंवा लहान मोठे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवतात, त्यांना त्यांच्या उतार वयातही पेन्शन मिळावी म्हणून सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केलेली आहे. नरेंद्र मोदींचं सर्वसामान्यांसाठी हे सर्वात मोठं गिफ्ट आहे. 
या योजनेअंतर्गत वयाच्या 60 वर्षानंतर, लोकांना त्यांनी भरलेल्या रकमेच्या प्रमाणात 1000 ते 5000 रुपयांपर्यंत मासिक पेन्शनचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम तुम्ही किती पैसे भरता म्हणजेच तुमचं योगदान किती आहे त्यावर अवलंबून आहे. परंतु जास्तीत जास्त पाच हजार रुपयापर्यंत तुम्हाला पेन्शन मिळू शकते. आता तुम्ही कोणत्या वयात आहात त्याप्रमाणे तुम्हाला रक्कम भरावी लागते व वयाच्या साठाव्या वर्षानंतर तुम्ही पेन्शनसाठी पात्र होता. 

तुम्ही रक्कम भरण्यासाठी मासिक त्रय मासिक किंवा अर्धवार्षिक हे पर्याय निवडू शकता. यामध्ये तुमचे बँक खाते असणे आवश्यक आहे. व ते बँक खाते अटल पेन्शन योजनेची जोडून घेणे आवश्यक आहे. व याच खात्यातून तुमचे पैसे कापले जातील, आणि तुम्ही जेव्हा साठ वर्षांचे व्हाल त्यानंतर तुम्हाला पेन्शनही याच खात्यामध्ये चालू होईल. 

जर तुम्हाला पाच हजार रुपये पेन्शन मिळवायचे असेल आणि वयाच्या आठव्या वर्षी जर खात तुम्हाला उघडायचा असेल तर तुम्हाला सहा महिन्याला 1240 रुपये भरावे लागतील. याच प्रमाणामध्ये तुमचं वय आणि तुम्हाला मिळणारी पेन्शन या प्रमाणात तुमचा हप्ता ठरवला जातो त्यामुळे या संदर्भातली अधिक माहिती तुम्ही बँक मध्ये जाऊन घेऊ शकता. बँकेत जाऊन तुम्ही अटल पेन्शन योजनेची तुमचं बँक खातं लिंक करून घ्या व यासंदर्भामध्ये तुमच्या वयानुसार तुम्हाला किती पैसे दर महा किंवा दर सहा महिन्यांनी भरावे लागतील या संदर्भातली माहिती घ्या आणि तुमचा हप्ता आजच चालू करून घ्या. व वयाच्या साठ वर्षानंतर तुम्ही जिवंत असेपर्यंत तुम्हाला दरमहा पेन्शन भारत सरकारकडून चालू राहील. 

तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद



Comments