मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आत्ताच बाहेर आलेली आहे. कारण मित्रांनो स्वातंत्र्यापूर्वी मुस्लिम समाज भारतामध्ये विकसित असल्याचा दिसून येत होतं परंतु आज हा समाज काळोखात ढकलला गेलेला आहे. त्याहीपेक्षा अधिक त्यांना आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मागासले पण आलेला आहे. आज देशाच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण देणे गरजेचे बनलेल आहे. याच मुस्लिम आरक्षणासाठी 21 ऑक्टोबरला पहिल्या मुस्लिम परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं होतं. आगामी काळामध्ये धुळे मालेगाव कोल्हापूर या सोबतच राज्यातील अन्य भागांमध्ये ही परिषद आयोजित केली जाणार आहे अशी माहिती मौलाना आझाद विचार मंचचे अध्यक्ष खासदार हुसेन दलवाई यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे. मुंबईमध्ये गांधी भवन मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत हुसेन दलवाई यांच्यासह मुस्लिम रिझर्वेशन फ्रंटचे सुभाष लोमटे अनवर राजन हे मान्यवर देखील उपस्थित होते. अलीकडेच कोर्टानेही मुस्लिम समाजाला कमीत कमी शैक्षणिक आरक्षण तरी मिळावं याबाबत अनुकूलता दर्शवली होती परंतु अजूनही आरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे आता मुस्लिम समाज आक्रमक झालेला आहे आणि यासाठी राज्यभरात मुस्लिम परिषद आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मिळालेली आहे. आता मुस्लिम समाजाला हे आरक्षण मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.
%20-%20Made%20with%20PosterMyWall.jpg)

Comments
Post a Comment